कोळसे पाटलांना एमआयएम चा विरोध ; वंचित आघाडीत फूट ! आमदार जलील लोकसभेच्या रिंगणात ?

Foto
औरंगाबाद : राज्याच्या राजकारणात नवा झंझावात म्हणून उदयास आलेल्या वंचित बहुजन आघाडीत जिल्ह्यात उभी फूट पडली आहे.  वंचित आघाडीने लोकसभेची उमेदवारी दिलेल्या न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांना एमआयएमने  विरोध केला आहे. लोकसभेसाठी आमदार इम्तियाज जलील यांनी रिंगणात उतरावे अशी गळ एमआयएमच्या नेत्यांनी घातली असून कालच्या बैठकीत जलील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते.

 वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पहिल्या टप्प्यातच औरंगाबादेतून माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांची उमेदवारी जाहीर केली होती. पाटलांच्या उमेदवारीला औरंगाबादेतून मोठा विरोध झाला. एमआयएम नेत्यांनी नाराजी वरिष्ठांपर्यंतही पोहोचवली.  मुंबईतील शिवाजी मैदानावरील मेळाव्यासाठी जातानाच जलील यांना नेत्यांनी उमेदवारीचे साकडे घातले होते. त्यावेळी मात्र जलील यांनी वेळ मारून नेली. दरम्यानच्या काळात एमआयएम नगरसेवकांनी जलील यांना लोकसभेसाठी रिंगणात उतरण्याचा आग्रह केला.

सिल्लोड नगर परिषदेत बसला फटका !
लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वंचित आघाडीत मोठी फूट पडली. एमआयएम नेते नाराज झाले. त्याचा फटका सिल्लोड नगर परिषदेच्या निवडणुकीत बसल्याचे सूत्रांनी सांगितले. या निवडणुकीत एमआयएम नेत्यांनी झोकून देऊन कामच केले नसल्याचे बोलले जाते या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एमआयएम  प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना अखेर हस्तक्षेप करावा लागला, असेही समजते. 
औरंगाबादेत एमआयएमचाच उमेदवार असेल :  डॉक्टर गफार कादरी 
दरम्यान एमआयएमचे नेते डॉ. गफार कादरी यांनी औरंगाबादेतून एमआयएम पक्षाचाच उमेदवार लोकसभेची निवडणूक लढवेल असे ठामपणे सांगितले. याबाबत एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्यासोबतही चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र आ. इम्तियाज जलील हेच उमेदवार असतील याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीत आमदार इमतियाज जलील यांच्या लोकसभा उमेदवारीवर शिक्कामोर्तब ?

आघाडीने जाहीर केलेल्या कोळसे पाटलांच्या उमेदवारीवर शहर तसेच जिल्हा एम आय एम नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे काल शहर कार्यालयात आमदार इम्तियाज जलील यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक बोलवण्यात आली या बैठकीला डॉक्टर गफार कादरी मनपाचे विरोधी पक्षनेते जमील कादरी यांच्यासह शहर तसेच जिल्ह्यातील एमआयएमचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते तर २६ नगरसेवकांचीही यावेळी उपस्थिती होती या बैठकीत आमदार इमतियाज जलील यांच्या लोकसभा उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याचे कळते वंचित आघाडीत फूट दरम्यान भारिपचे नेते तसेच वंचित आघाडीचे समन्वयक प्रकाश आंबेडकर यांनी बी जी कोळसे पाटील यांची उमेदवारी जाहीर केली होती गेल्याच आठवड्यात कोळसे-पाटील यांनी आपण औरंगाबादेतून निवडणूक लढविणार असल्याचे जाहीरही केले आहे कोनसे पाटलांच्या कार्यकर्त्यांनी तयारीही सुरू केली आहे अशा परिस्थितीत कोळसे-पाटील यांच्या नावाला विरोध करीत जलील यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे त्यामुळे औरंगाबाद तरी औरंगाबादी तरी आधारित वंचित आघाडीत फूट अटळ असल्याचे दिसते

स्थानिक उमेदवार असावा...

लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. कोळसे पाटील यांनी देखील निवडणूक लढविणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचा विचार करता मराठा, बहुजन पाठोपाठ मुस्लिम आणि दलितांची संख्या मोठी आहे. दलित- मुस्लिमांची संख्या सात लाखांवर आहे. असे असतानाही वंचित आघाडीने स्थानिक उमेदवाराचा विचार न करता कोळसे पाटील यांचे नाव जाहीर केले. त्यामुळे मुस्लिम तसेच दलित कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम निर्माण झाला. मनपातही  एमआयएमतर्फे निवडून गेलेल्या २५ नगरसेवकांपैकी पाच नगरसेवक दलित समाजाचे आहेत. एमआयएम ने  दलित वस्त्यांमध्येही चांगली कामे केली आहेत. त्याचा फायदा लोकसभा निवडणुकीत होणार आहे.  वंचित आघाडीने स्थानिक उमेदवाराचा विचार करायला हवा होता, अशी नाराजी अनेक कार्यकर्त्यांनी बोलून दाखविली. मात्र आता एमआयएमने  निवडणूक रिंगणात उतरण्याचे जाहीर केल्याने दलित मुस्लिम कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker